रोहित गोळे
भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर रोमहर्षक विजय मिळवला, अवघ्या 2 धावांनी श्रीलंका पराभूत झालं.
या मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार आहे, तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
पण पहिल्याच सामन्यात असं काही घडलं की, सूर्यकुमारला काही काळ कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागली.
श्रीलंकेच्या डावात 11व्या षटकात दुखापत झाल्याने पांड्या मैदानाबाहेर गेला.
झेल घेताना पांड्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली, पण ही दुखापत फारशी गंभीर नाही.
पण दुखापत वाढू नये यासाठी पांड्या मैदानाबाहेर गेला. ज्यानंतर सूर्यकुमारने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि संघाला विजयाच्या दिशेने नेलं
काही वेळाने पांड्या पुन्हा मैदानात आला आणि त्याने आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला.