Ind vs Sl: तिसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी, कारण...

मुंबई तक

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव त्याच्या खेळीमुळे मागील काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने शतकही झळकावलं.

सूर्याच्या या चमकदार कामगिरीनंतरही त्याला पहिल्या दोन वनडेत खेळवलं गेलं नाही.

सूर्यकुमार यादवच्या जागेवर श्रेयस अय्यरला खेळवलं गेलं.

मात्र, श्रेयस अय्यरला अपेक्षित खेळ करता आला नाही. दोन्ही सामन्यात सेट झाल्यानंतरही तो बाद झाला.

त्याचबरोबर शुभमन गिललाही चांगला खेळ करता आला नाही. भारताने मालिकेत 2-0 आघाडी घेतलीये.

त्यामुळे संघात बदल म्हणून तिसर्‍या वनडेत सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.