...तर कबीर सिंगची 'प्रिती' कियारा अडवाणी नव्हे, तारा सुतारिया असती!

मुंबई तक

तारा सुतारियाने कमी काळातच अभिनेत्री म्हणून आपली ओळख बनवली आहे. आता तिचा 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तारा सुतारिया सध्या व्यस्त आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच तारा सुतारिया चांगली डान्सरही आहे आणि गायिकाही आहे.

अभिनेत्री तारा सुतारियाला चार वर्षात आतापर्यंत तिने पाच चित्रपटांत भूमिका केल्या, पण एकही चित्रपट हिट झाला नाही. त्यामुळे तारा सुतारिया अजूर्न कपूरसोबतच्या एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

तारा सुतारियाने सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ सोबत काम केलं आहे, मात्र दर्शकांवर छाप पाडण्यात ती अपयशी ठरली. त्यामुळे अर्जून कपूरसोबत तरी तारा सुतारिया प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल, असं अपेक्षा व्यक्त केली जातेय.

तारा सुतारियाने बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरूवात केली. डिस्ने चॅनेलवरील रिअॅलिटी शो बिग बडा बूम मध्ये तिने ती गायिका म्हणून दिसली होती. पहिल्यांदा तारा सुतारिया टिव्हीवर दिसली, तेव्हा तिचं वय होतं १३ वर्ष.

तारा सुतारियाने रिअॅलिटी टॅलेंट शो एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा मध्ये गाणं म्हणण्याबरोबरच डान्सही केला होता. त्या शोचे जज अनु मलिक आणि फराह खान होते.

डिस्ने चॅनेलवरील आणखी दोन शोमध्येही तारा सुतारिया दिसली होती. 'दी सुइट लाईफ ऑफ करण अॅण्ड कबीर' आणि 'ओए जस्सी' या शो मध्ये तिने परफॉर्म केलं होतं.

तारा सुतारियाने छोट्या पडद्यावर चांगली ओळख मिळवली. त्यानंतर तारा सुतारियाने २०१९ मध्ये करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या स्टुडंट ऑफ दी ईअर २ मध्ये मुख्य भूमिका केली होती.

टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट हिट झाला नाही, पण सिनेमाने तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.

स्वतः करण जोहरने तारा सुतारियाला या चित्रपटातील भूमिकेची ऑफर दिली होती. २०१९ मध्ये आलेला आणि सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह चित्रपटाची ऑफरही तारा सुतारियाला मिळाली होती.

तारा सुतारियाने ही ऑफर स्वीकारली असती, तर कबीर सिंगच्या प्रितीच्या भूमिकेत तारा सुतारिया बघायला मिळाली असती. मात्र, स्टुडंट ऑफ दी इअर २ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने तारा सुतारियाने कबीर सिंग चित्रपटातील भूमिकेची ऑफर नाकारली.

२०१९ मध्येच तारा सुतारियाचा दुसरा चित्रपट आला होता. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. हा चित्रपट होता 'मरजावां'!

मरजावां हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला. या चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांचं नाव जोडलं गेलं, पण त्यांनी हे फेटाळून लावलं होतं.

वर्ष २०२१ मध्ये तारा सुतारिया सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत पडद्यावर झळकली. हा चित्रपट सलमान खानने प्रमोट केला होता, तरीही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. अहान शेट्टीचा हा पहिलाच चित्रपट होता.

२०२१ मध्येच तारा सुतारिया दुसऱ्यांदा टायगर श्रॉफसोबत स्क्रीन दिसली. हिरोपंती २ मध्ये तारा सुतारियाने भूमिका केली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला.

चार वर्षात सलग पाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानं तारा सुतारिया एका हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.

आता तारा सुतारिया अभिनेता अर्जून कपूरसोबत एक व्हिलन रिटर्न्स मध्ये दिसणार आहे.

एक व्हिलन रिटर्न्समधून तारा सुतारिया आणि अर्जून कपूर यांची जोडी कमाल दाखवणार का, हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे.

तारा सुतारियाचा जन्म १९ नोव्हेंबर १९९५ रोजी मुंबईत झालेला आहे. तारा सुतारियाचे वडिलांचं नाव हिमांशु सुतारिया, तर आईचं नाव टीना सुतारिया आहे. तारा सुतारियाला जुळी बहीण असून, तिचं नाव पिया सुतारिया आहे.

तारा सुतारिया फोटो इन्स्टाग्राम