मुंबई तक
'तारक मेहता का उलटा चष्मा' 14 वर्षांपासून सुरू असणारा प्रत्येक वयोगटातील लोकांच्या आवडीचा शो.
या लोकप्रिय मालिकेने आणि त्यातील पात्रांनी कित्येकांची मनं जिंकली.
आज या शोची क्रेझ आणि TRP घटताना दिसत आहे.
एकेकाळी हीट असणाऱ्या शोमधील कलाकारांनी काही कारणांमुळे मालिका सोडली याचा परिणाम थेट टीआरपीवर झाला.
कलाकारांनी शो सोडून जाणं हे निर्मात्यांसाठी चिंतेची बाब आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
शोमध्ये पहिल्यासारखी मजा नाही राहिली असे, बऱ्याच वेळा म्हटले जाते.
आता शोचे डायरेक्टर मालव राजदा यांनीही मालिका सोडली आहे.
याआधी शो सोडलेली अभिनेत्री प्रिया अहुजा म्हणजेच रीटा रिपोर्टर ही राजदा यांची पत्नी आहे.
आता शो बंद होणार की, काय? असे सवाल लोकांनी केले आहेत यावर प्रियाने आपले मत मांडले.
प्रिया म्हणते, 'TRP चा नंबर गेम मला कधीच समजला नाही. पण तारक मेहता ही मालिका बंद होईल यावर माझा विश्वास नाही.'
यापूर्वी, शैलेश लोढा, दिशा वकानी, भव्या गांधी, राज अनदकत अशा लोकप्रिय कलाकारांनी हा शो सोडला आहे.https://www.mumbaitak.in/web-stories