KL राहुलची जागा घेण्यासाठी ५ प्लेअर्स तयार! फक्त एका संधीच्या शोधात...

मुंबई तक

खराब फॉर्मशी झगडत असलेल्या के.एल राहुलची जागा घेण्यासाठी टीम इंडियामध्ये पाच शिलेदार तयार आहेत.

शुभमन गिल : रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीसाठी प्रभावी ठरू शकतो. शुभमन गिलने बांग्लादेश दौऱ्यावर कसोटीत शतक केले असून तो फॉर्ममध्ये आहे.

संजू सॅमसन : यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारतीय संघात फारशी संधी मिळालेली नाही. T20 मध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुलसाठी संजू सॅमसन हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो

इशान किशन : T20 मध्ये सलामीवीर म्हणून KL राहुलच्या जागी इशान किशन सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. डावखुऱ्या किशनने 21 टी-20 सामने खेळले असून त्याने 29.45 च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड : महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराजने चार शतके झळकावली.

पृथ्वी शॉ : 23 वर्षीय पृथ्वी शॉ टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलला एक चांगला पर्याय ठरु शकतो. पृथ्वी याआधी भारताकडून सलामीवीर म्हणूनही खेळला आहे.