मुंबई तक
न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 24 जानेवारीला आहे.
भारताने 2-0 ने मालिका जिंकलेली असून, टीम इंडिया इंदूरमध्ये अंतिम सामना खेळणार आहे.
तिसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनासाठी पोहोचले.
सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि इतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले.
सर्व क्रिकेटपटू भगवी वस्त्र परिधान करून बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाले.
वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव यांचे भस्म आरतीचे फोटोही व्हायरल झाले.
सूर्यकुमार म्हणाला, 'आम्ही ऋषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली.'
'भारतीय क्रिकेट संघासाठी ऋषभचं पुनरागमन खूप महत्त्वाचं आहे', असं सूर्यकुमार म्हणाला.