अश्रू आणि हुंदके! बाळासाहेब ठाकरेंना अखेरचा निरोप देतानाचे 'ते' क्षण

मुंबई तक

दहा वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळा महाराष्ट्र लोटला होता.

फोटो | Mandar Deodhar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

फोटो | Mandar Deodhar

बाळासाहेब ठाकरेंचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लाखोंची गर्दी जमा झाली होती. प्रचंड शांतता आणि फक्त अंत्य दर्शनाचा एक ध्यास इतकंच जमलेल्यांच्या मनात होतं

Mandar Deodhar

बाळासाहेब ठाकरेंना शेवटचा निरोप देण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकाच ठिकाणी जमले होते. ते ठिकाण होतं शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कचं मैदान

Mandar Deodhar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्यासोबत नितीन सरदेसाई आणि शिवसेना खासदार संजय राऊत

Mandar Deodhar

बाळासाहेब ठाकरेंचे नातू तेजस ठाकरे आणि शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे

Mandar Deodhar

शिवसैनिकच नाही सगळ्या महाराष्ट्राला अश्रू अनावर झाले होते

Mandar Deodhar

मातोश्री या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कलाकारांनीही गर्दी केली होती. अभिनेता सलमान खान मातोश्रीवर आला होता तेव्हाचं छायाचित्र

Mandar Deodhar

उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावार अंत्यविधी करत असताना सगळ्या महाराष्ट्राने हंबरडा फोडला होता

Mandar Deodhar

बाळासाहेब ठाकरे अमर रहे!, श्वासांची माळ तुटली ध्यासांची नाही असे बॅनर घेऊन शोकाकुल शिवसैनिक शांतपणे उभे होते

Bhaskar Paul

बाळासाहेब ठाकरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला अथांग जनसागर

Mandar Deodhar

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव ठेवलेल्या चितेला अग्नी दिला आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्याही अश्रूंचा बांध फुटला

Mandar Deodhar