हिवाळी अधिवेशनातला Hot टॉपिक, राणे-ठाकरे समोरासमोर अन्...

मुंबई तक

हिवाळी अधिवेशनात एक नवीच चर्चा आज सुरु झाली आहे.

खरं तर राणे-ठाकरे यांच्यातील शत्रुत्व अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.

राणे आणि ठाकरे हे नेहमीच एकमेकांवर टोकाची टीका करतात.

अशातच आज नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांच्या बाजूने गेले त्यावेळी त्यांचे असे काही फोटो टिपले गेले की, ज्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

नितेश राणे हे विधीमंडळ परिसरात काही पत्रकारांशी बोलत असतानाच त्याच ठिकाणी आदित्य ठाकरे हेही आले.

आदित्य ठाकरेंसोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सोबत होते.

जेव्हा आदित्य ठाकरे नितेश राणेंच्या जवळ आले त्यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही.

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळेच दोन्ही आमदारांना एकमेकांकडे अक्षरश: दुर्लक्षच केलं.