IPL Auction 2023: अरेरे... 'या' क्रिकेटर्ससोबत असं कसं झालं? 15 कोटींहून थेट..

मुंबई तक

शुक्रवारी IPL चं मिनी लिलाव पार पडलं. यामध्ये गेल्यावर्षी महागडे ठरलेल्या अनेक खेळाडूंना भलतीच कमी रक्कम मिळाली. 2021मध्ये 15 कोटीत RCB ने विकत घेतलेल्या काईल जेमिसनला यंदा फक्त एक कोटीत चेन्नईने घेतलं. ग
All Photo's Source Google
गेल्या सिझनमध्ये 14 कोटीत हैदराबादने रिटेन केलेल्या केन विलियम्सनला यंदा त्याची बेसप्राईज असलेली रक्कम दोन कोटीत गुजरात टायटन्सनं खरेदी केलं.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसनला मुंबईच्या संघाने 1.50 कोटीत खरेदी केलं. 2021 च्या लिलावात पंजाबने झायसाठी तब्बल 14 कोटी रु. मोजले होते.
2021 च्या लिलावात 14 कोटीत पंजाबच्या संघाने खरेदी केलेल्या मयांक अग्रावालसाठी यंदा फक्त 8.25 कोटीपर्यंत बोली लागली. आता तो हैद्राबादच्या संघात गेलाय
गेल्या लिलावात 7.50 कोटीत गेलेल्या रोमिरिओ शेफर्डला यंदा लखनौच्या संघानं त्याच्या बेसप्राईज असलेली रक्कम 50 लाखात खरेदी केलं.
मागच्या वेळी 6 कोटीत सोल्ड झालेला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथल यंदा मात्र त्याला गुजरातने फक्त 50 लाखात खरेदी केलंय. त्याचं 5.50 कोटींचं नुकसान झालं.
आयपीएलच्या लिलावात कधीकाळी भाव खाऊन गेलेल्या खेळाडूंना यंदा आपल्या बेसप्राईजमध्ये जावं लागलं.