ईशा अंबानी ते अदर पूनावाला, 'ही' आहेत भारतीय अब्जाधीशांची स्टायलिश मुलं

मुंबई तक

भारतातील दिग्गज उद्योगपतींमुळे त्यांची मुलं अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहतात.

बहुतेक अब्जाधीशांच्या मुलांनी भारताबाहेर शिक्षण घेतलं आहे आणि ते खूप स्टायलिश दिसतात.

भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि त्यांच्या स्टायलिश मुलांबद्दल जाणून घेऊया.

ईशा अंबानी ही मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. ईशा रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि रिलायन्स रिटेलची संचालक आहे.

ईशा खासगी आयुष्यात खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. एखाद्या फंक्शनमध्ये तिचा लूक आणि ड्रेसिंग सेन्स पाहण्यासारखा असतो.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ दर पूनावाला हे डॉ. सायरस पूनावाला यांचे चिरंजीव आहेत.

42 वर्षीय अदार पूनावाला यांना पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे कारण ते खूपच हँडसम दिसतात.

हँडसम हंक आकाश अंबानी हा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आहे.

आकाश अंबानीचा ड्रेसिंग सेन्स डॅशिंग आणि अप्रतिम आहे. म्हणूनच लोक खूप प्रशंसा करतात.

कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला व्यवसायाने संगीत कलाकार आहे. तिचे अनेक कॉन्सर्ट होतात.

अनन्या बिर्लाचे इंस्टाग्राम फोटो पाहता ती खूपच स्टायलिश असल्याचे दिसते. तिला कॅज्युअल-मॉडर्न ड्रेस घालायला आवडतात.

रोशनी नाडर ही एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी आहे. फोर्ब्सच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांमध्ये तिचं नाव आलं आहे.

रोशनी नाडरचे फार कमी फोटो उपलब्ध आहेत, परंतु सोशल मीडियावर लोक तिच्या ड्रेस आणि लूकचे कौतुक करतात.