हे पदार्थ वाढवतात तुमचं आयुष्य; भरपूर जगायचं असेल, आहारात समावेश करा

मुंबई तक

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर हवं असतं.

असं म्हणतात ना की, आरोग्य हीच खरी संपत्ती असते आणि ते खरंही आहे.

निरोगी आयुष्यासाठी पोषक आणि संतुलित आहारही गरजेचा असतो.

हेल्दी डाएट फक्त आजारांपासून वाचवत नाही, तर आनंदी आयुष्यासाठी चांगलं असतं.

फळं ही पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे नेहमी फळं खाणं शरीरासाठी उत्तम असतात.

दिवसातून दोन फळं तर खाल्लीच पाहिजेत, ज्यामुळे प्रथिन्यांसारखे पोषक तत्व मिळतात.

तसंच, अळशी खाणंही शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यामध्ये ओमेगा-3, कॅल्शियम, बोरॉन असे बरेचसे पोषक तत्व असतात.

नाश्ता करताना दलिया, ओट्स यांसारख्या पदार्थांचाही समावेश आवश्यक आहे.

दलिया, ओट्स शरीराला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवतात.