मुंबई तक
एका मुलीने ट्विटरवर तिचा फोटो पोस्ट करत मदत मागितली. आता तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
नैना नावाच्या युजरने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
मुलीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं, "फोटोग्राफर आणि या सर्व लोकांना कुणीतरी बाजूला सारू शकेल का जेणेकरून माझ्यावर फोकस होईल?"
यानंतर हा फोटो एवढा व्हायरल झाला की, मुलीलाही आश्चर्याचा धक्का बसला.
तिच्या या फोटोवर लोकांनी जबरदस्त कमेंट केल्या आहेत. ज्या पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.
लोकांनी वेगवेगळा बॅकग्राऊंड लावून हा फोटो एडिट केला आहे. आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लोकांनी या ट्वीटला लाईक केलं आहे.
नैना म्हणाली, 'लोकांचं मन खूप मोठं आहे. एखाद्याकडे मदत मागितली तर हजारो मदतीला धावले. काहींनी टायटॅनिक जहाजावर तर काहींनी चंद्रावर पोहोचवलं.'
एका यूजरने तर विज्ञानातील एक उदाहरण देत तरुणीचा फोटो एडिट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आता सर्व फोकस तुझ्यावर आहे.'