नालासोपारातील कुटुंबावर काळाची झडप! चिमुकलीसह तिघे जागीच ठार

मुंबई तक

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचा भीषण असा अपघात झाला.

डहाणूतील महालक्ष्मी येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत.

या जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये एका एक वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

हे कुटुंब मूळचं नालासोपारा येथील असून ते गुजरातकडे जात असताना हा अपघात घडला.