Donhi-Sachin नाही तर हा आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर...

मुंबई तक

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? याचं उत्तर देणारा २०२३ चा सर्व क्रिकेटरच्या नेटवर्थचा डेटा समोर आला आहे.

CEO वर्ल्ड मॅगझिनच्या मते ऑस्ट्रेलियाचा एकेकाळचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट हा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. त्याची नेटवर्थ ३ हजार १३४ करोड रुपये आहे.

दुसऱ्या नंबरवर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडूलकरचा समावेश होतो. सचिनची नेटवर्थ १ हजार ४०२ करोड रुपये आहे.

तिसऱ्या नंबरवर भारताचा आजपर्यंतचा यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा समावेश होतो. धोनीची नेटवर्थ ९४९ कोटी आहे.

धोनीनंतर चौथ्या नंबरवर माजी कॅप्टन विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीची नेटवर्थ ९२३ कोटी आहे.

पाचव्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचा नंबर लागतो. पॉटिंगची नेटवर्थ ७५ मिलियन डॉलर आहे.