Tunisha Sharma Death : तुनिषाने यापूर्वीही केलेला आत्महत्येचा प्रयत्न; तेव्हा नेमकं काय घडलेलं?

मुंबई तक

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे टीव्ही जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

All Photo Credit Instagram

आत्महत्येला प्रवृत्त केलेल्या आरोपावरून तिचा सह-अभिनेता शीजान खान अटकेत आहे. दोघे सहा महिने रिलेशनशिपमध्ये देखील होते.

जसंजसा तपास पुढा पुढे जात आहे, तसंतसं अनेक गोष्टी समोर येत आहेत.

यापर्वी देखील तुनिषानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेंव्हा मी तीला वाचवलं होतं, असं शीजाननं पोलिसांना सांगितलं आहे.

त्यावेळी झालेला प्रकार आपण तिच्या आई-वडिलांना सांगितला होता, असं शीजान पोलिसांना म्हणाला.

पोलीस शीजाननं केलेले दावे आणि तुनिषाच्या आईने केलेल्या आरोपवर सखोल तपास करत आहेत.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राम कदम यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादशी जोडलं आहे. मात्र पोलिसांना लव्ह जिहादचा अँगल नसल्याचं सांगितलं आहे.