'तुनिषाची हत्याच झालीय'; प्रत्युषाच्या वडिलांचा दावा

मुंबई तक

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीने 23 डिसेंबर रोजी मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

यापूर्वी टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनेही तिचा लिव्ह-इन बॉयफ्रेंड राहुलसोबत मतभेद झाल्यानंतर आत्महत्या केली होती. मात्र तिचा खून झाल्याचं तिच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे.

प्रत्युषाच्या वडिल शंकर बॅनर्जी यांनी तुनिषाच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे.

त्यांचं म्हणणं आहे की प्रत्युषाप्रमाणे तुनिषाची देखील हत्या करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूतसोबत देखील असंच घडलं होतं, असं शंकर बॅनर्जी यांचं म्हणणं आहे.

20 वर्षीय तुनिषाच्या मृत्यूने मी आणि माझ्या पत्नीला खुप दु:ख पोहोचले आहे, असं ते म्हणाले.

जर एखाद्याने हेतुपुरस्सर आत्महत्या केली असेल तर तो खात्री करतो की त्याने एक चिठ्ठी किंवा पत्र मागे सोडले आहे. जेणेकरून इतर लोकांना त्रास होणार नाही. ही 100% हत्या आहे, असं प्रत्युषाचे वडिल म्हणाले.