Tinusha Sharma : तुनिषा आत्महत्या प्रकरणात शीनाज खान कसा अडकला?

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या हत्येनं हळहळ व्यक्त होतेय.

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असून, तिने आत्महत्या का केली, याबद्दल तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय.

तुनिषा शर्मा मालिकेतील आणि सह कलाकार शीनाज मोहम्मद खान हे रिलेशनशिपमध्ये होते.

शीनाज मोहम्मद खानने ब्रेकअप केल्यामुळेच तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबियांनी म्हटलंय.

तुनिषाच्या आईने तशी तक्रार पोलिसांत दिली असून, शीनाज मोहम्मद खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकही केलीये.

'15 दिवसांपूर्वी शीजानने तुनिषा शर्मासोबत ब्रेकअप केलं. ती नैराश्यामध्ये होती. त्यामुळे तुनिषाने (24 डिसेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली,' असं तिच्या आईने म्हटलंय.