Tunisha Sharma : 'त्या' १५ मिनिटांमध्ये काय घडलं? पोलीस लागले तपासाला

मुंबई तक

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यादिवशी अवघ्या १५ मिनिटांमध्ये काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत.

शनिवारी सकाळी तुनिषा अत्यंत आनंदात मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी घरातून निघाली होती.

पहिल्या शिफ्टचे शूट संपल्यानंतर शीजान आणि तुनिषाने दुपारी ३ वाजता मेकअप रूममध्ये एकत्र जेवण केले.

यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये म्हणजे ३.१५ वाजता तुनिषाने आत्महत्या केली.

याच १५ मिनिटात नेमकं काय झालं की तुनिषाने आत्महत्येचं पाऊल उचललं हा तपास आता पोलीस करत आहेत.

कॉल्स आणि चॅट्स रिट्रिव्ह करण्यासाठी पोलिसांनी तुनिषा आणि शीजान या दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत.