समृद्धी महामार्गावर अपघात, आई जागीच ठार, चिमुकली 200 फुटांवर जाऊन पडली

मुंबई तक

मुंबई-नागपूर या दोन शहरांमधील प्रवासातील वेळ कमी करण्यात महत्त्वाचा असलेल्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झालाय.

जका खान, वाशिम

तुळजापूरवरून नागपूरकडे जात असताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनद गावाजवळ समृद्धी महामार्गावर कार अपघातग्रस्त झाली.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना बुधवारी (28 डिसेंबर) पहाटे 2 ते 3 वाजेच्यादरम्यान घडली.

नागपुर हाइकोर्टात वकील असलेले अजय जोशी हे तुळजापूरवरुन दर्शन करुन नागपूरला घरी निघाले होते, त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

जोशी यांच्या पत्नी आदिती जोशी (36 वय) आणि मुलगी (4 वर्ष) हे जागीच ठार झाले.

जोशी यांची 4 वर्षाची मुलगी आनंदी कारच्या बाहेर फेकली गेली आणि 200 फूट अंतरावर जाऊन पडली.

अजय जोशी आणि 10 वर्षीय मुलीवर अकोला येथे उपचार सुरू असून, अपघात वन्य प्राणी आडवा आल्यानं किंवा डुलकी लागल्यामुळे शक्यता व्यक्त करण्यात आलीये.