मुंबई तक
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दोन पत्नींनी आपल्या एका पतीची वाटणी करून घेतली आहे. ज्याची आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
व्यवसायाने इंजिनीअर असलेला पती समजुतीतून पहिल्या पत्नीसोबत 3 दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत 3 दिवस घालवणार आहे.
त्याचवेळी, तो रविवारच्या दिवशी त्याच्या स्वेच्छेने कोणासोबतही राहू शकतो.
कोर्टाबाहेर झालेल्या काउन्सिलिंगमध्ये पती-पत्नीमध्ये हा अनोखा करार झाला आहे.
यासोबतच पतीने असंही सांगितलं की, पहिल्या पत्नीचं वागणं चांगलं नाही. त्यामुळेच त्यांने दुसरं लग्न केलं.
हा तरुण पेशाने इंजिनीअर असून गुरुग्राममध्ये काम करतो. त्याची पहिली पत्नी ग्वाल्हेरमध्येच राहते.
लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये घरून काम सुरू झाले. पण ग्वाल्हेरमध्ये काही दिवस घालवल्यानंतर तो गुरुग्रामला परतला.
काही दिवसांनी त्याने दुसरं लग्न केलं. त्यानंतर दुसऱ्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला.
हा प्रकार पहिल्या पत्नीला कळताच गोंधळ उडाला आणि पतीची दोन पत्नींमध्ये वाटणी झाली.