'तुझ्यापेक्षा उर्फी बरी...' 83 हजार किंमतीच्या जीन्समुळे शिल्पा शेट्टी ट्रोल

मुंबई तक

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बरीच चर्चा रंगली.

फोटो सौजन्य: instagram

शिल्पाने पार्टीसाठी घातलेल्या जीन्सची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे.

फोटो सौजन्य: instagram

शिल्पा ब्लॅक टॉप आणि दोन टोन्ड डेनिम जीन्समध्ये दिसली. पण याच लूकमुळे शिल्पाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

फोटो सौजन्य: instagram

शिल्पाची ब्ल्यू आणि ब्लॅक मिक्स जीन्स ही खूपच वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. त्यावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फोटो सौजन्य: instagram

काही यूजर्संना शिल्पाची फॅशन ऑन पॉइंट वाटली. त्यामुळे अनेकजण तिला उर्फीपासून प्रेरणा घेत असल्याचं म्हणाले.

फोटो सौजन्य: instagram

अनेकांचं असं म्हणणं आहे की, उर्फीने शिल्पाची जीन्स डिझाइन केली आहे. काही जण असंही म्हणाले की, तुझ्यापेक्षा उर्फी बरी.

फोटो सौजन्य: instagram

शिल्पाच्या या जीन्सची किंमत तब्बल 83,897 रुपयांची आहे. किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.

फोटो सौजन्य: instagram

शिल्पाने लूक अगदी सिंपल ठेवला होता. मोकळे केस, हलका मेकअप आणि ब्लॅक हिल्समध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

फोटो सौजन्य: instagram