मुंबई तक
उत्तर-प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात आदित्यनाथ यांनी चित्रपटसृष्टी-उद्योगविश्वातील अनेक तज्ञांच्या, दिग्गजांचा गाठीभेटी घेतल्या.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर-प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला.
चांगले रस्ते, विमानतळ, सुरक्षित वातावरणाची हमी, नवीन चित्रपट धोरण, याबद्दलची माहिती दिली.
उत्तर प्रदेशला चित्रपटाशी संबंधित गुंतवणूक आणि शूटिंगसाठी डेस्टिनेशन म्हणून सज्ज करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
आज अभिनेता अक्षय कुमार-योगी आदित्यनाथ यांची मुंबईत भेट झाली.