Vada-Pav : जगातील टॉप १५ सॅन्डविचमध्ये मुंबईतील वडापाव...

मुंबई तक

लहानापासून ते मोठ्यापर्यंत चवीने खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे वडापाव.

तोंडाला पाणी आणणाऱ्या या वडापावचा शोध १९६० मध्ये अशोक वैद्य यांनी लावला. 

१९९० नंतर अमेरिकन फास्ट फूड चेन मॅक्डाॅनल्ड, केएफसी, डॉमिनॉज अशा फुड चैन भारतात आल्या. याच मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झाला.

पण त्याचा महाराष्ट्रातील वडापाववर काही परिणाम झाला नाही. 

आता याच वडापावला वैश्विक मान्यता मिळाली आहे. जगातील टॉप सॅन्डविचमध्ये वडापाव १३ नंबरवर आला आहे.

अॅटलासकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील टॉप ५० सॅन्डविचमध्ये वडापावने १३ वे स्थान प्राप्त केलं आहे.