Jagdeep Dhankhar : भारताचे उपराष्ट्रपती सिद्धिविनायकाच्या चरणी

मुंबई तक

उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जगदीप धनखड यांचे आज मुंबई येथे आगमन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जगदीप धनखड यांचे स्वागत केले.

जगदीप धनखड यांच्यासह त्यांच्या पत्नी डाॅ. सुदेश धनखड देखील आल्या आहेत.

जगदीप धनखड यांच्या स्वागताला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव नंद कुमार व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

जगदीप धनखड यांनी आज सिद्धिविनायकाच्या मंदीराला भेट दिली. यावेळी आदेश बांदेकर यांनी त्यांचं स्वागतं केलं.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सपत्निक सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं