मुंबई तक
दुबईत नवीन वर्ष साजरं केल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या कुटुंबियांसह मथुरेला भेट दिली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने याआधीही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत.
दोघंही यावेळी मुलगी वामिकासह 2 दिवस वृंदावनला गेले होते.
मथुरेतील अनेक धार्मिक आश्रम आणि मंदिरांना भेटी दिल्या आणि संतांचे आशीर्वाद घेतले.
या भेटीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते चिमुकल्या वामिकाने. अनुष्काच्या मांडीवर बसून मस्ती करणाऱ्या वामिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वामिकाचा हा नटखट मस्तिखोर अंदाज पाहून चाहते अगदी आनंदित झाले आहे.