Virat Kohli : नॉर्वेच्या स्टाईल गँगसोबत कोहलीने धरला ठेका, Video व्हायरल

मुंबई तक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये किंग कोहली एका खास अंदाजात डान्स करताना दिसला.

कोहलीच्या डान्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र यावेळी त्याचा हा अंदाज काही वेगळाच होता.

कोहलीने क्विक स्टाइल गँग या लोकप्रिय डान्स ग्रुपसोबत जबरदस्त डान्स केला.

हा व्हिडीओ क्विक स्टाइल ग्रुपने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

क्विक स्टाइल गँग हा नॉर्वेचा हिप-हॉप डान्स ग्रुप आहे, जो सध्या भारतात आला आहे.

या डान्स ग्रुपने विराट कोहलीची भेट घेतली आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र डान्स केला.

व्हिडीओमध्ये विराट कोहली हातात बॅट घेऊन नाचताना दिसतोय.