थंडीनिमित्त विठोबा-रखुमाईस उबदार पोशाख : कशी असते ही प्रथा? वाचा सविस्तर

मुंबई तक

सध्याच्या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस मंदिर समितीकडून रजाई, शाल, मफलर व कानपट्टी असा पोशाख परिधान केला आहे.

थंडीच्या दिवसात प्रक्षाळपुजेनंतर विठूरायाच्या मूर्तीला हा उबदार पोशाख घालण्यास सुरुवात केली जाते.

श्रीविठ्ठल मंदिरात रात्रीच्या वेळी होणारी शेजारती झाल्यानंतर विठूराया झोपी जाण्यापूर्वी मूर्तीच्या डोक्याभोवती एका विशिष्ट पद्धतीने मुंडासे बांधले जाते. त्यानंतर विठू माऊलीच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून उपरण्याची सुती कानपट्टी मूर्तीच्या कानाला बांधण्यात येते.

विठ्ठल मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत पांढरा शेला देण्यात येतो. या शेल्यावर उबदार शाल आणि काश्मिरी रजई घातली जाते. नंतर विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात तुळशीचा हार घातला जातो.

विठूराया प्रमाणेच श्री. रुक्मिणीच्या मूर्तीलाही थंडी वाजणार नाही याची काळजी याद्वारे घेण्यात येते.

पहाटेच्या काकडच्यावेळी विठ्ठल मूर्तीवरील फक्त काश्मिरी रझई काढण्यात येते. बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवले जातात.