मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी (कल्याण)
डोंबिवलीतील एका कुटुंबाने आपल्या मुलीचं नाव चक्क 'शिवसेना' ठेवलं आहे.
पांडुरंग आणि नीलम वाडकर या दाम्पत्याच्या घरात शिवसेना जन्माला आली.
१७ ऑक्टोबर २०२२ ला रायगड जिल्ह्यातील किये गावात 'शिवसेना' नाव असलेल्या या चिमुकलीचा जन्म झाला.
शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता असलेल्या पांडुरंग यांनी बाळासाहेब ठाकरे स्वप्नात आल्याचा दावा करत मुलीचे नाव "शिवसेना" ठेवण्याचा निर्णय घेतला.
गावी मोठा बरसा साजरा करीत चिमुकलीचे नाव "शिवसेना" ठेवले.
सध्या सुरू असलेल्या राजकारणाने दुःख होतं, मात्र मुलीचं नाव 'शिवसेना' ठेवल्यापासून घरात सुखं नांदत असल्याचं पांडुरंग सांगतात.