रोहित गोळे
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चे 724 कोटी रुपयांचे 28 पायाभूत सुविधा प्रकल्पांचं अनावरण केलं.
अरुणाचल प्रदेशातील अलॉन्ग-यिंकिओंग रस्त्यावरील सियोम ब्रिज येथे संरक्षणमंत्र्यांनी या प्रकल्पांचा शुभारंभ केला.
सियोमसह 22 पूल आणि इतर 3 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
देशातील अत्यंत महत्त्वाची राज्य असणाऱ्या लडाख-जम्मू काश्मीरसह एकूण 22 प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, 'आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मजबूत आणि आत्मनिर्भर 'नवा भारत' तयार करण्याचं उद्दिष्ट आहे.
ते पुढे म्हणाले, 'भारत नेहमीच युद्धाच्या विरोधात राहिला आहे. हेच आमचे धोरण आहे.'
राजनाथ पुढे म्हणाले की, 'पण जर ते आमच्यावर लादले गेले तर आम्ही नक्कीच लढू. आमचे सशस्त्र दल सज्ज आहे.'