यावरच भारत जोडो यात्रेमध्ये घेतलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मला 'पप्पू' संदर्भात काहीच अडचण नाही. पूर्वी माझ्या आजीला (इंदिरा गांधी) गुंगी गुडिया म्हणत होते, आज त्यांनाच आयर्न लेडी म्हणतात.
"राजकारणात एकमेकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारणं हा प्रचाराचा एक भाग आहे, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.
मला आज जे पप्पू म्हणत आहेत ते आतून घाबरले आहेत. मला कोणत्याही नावानं हाक मारायला हरकत नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.