मुंबई तक
अमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात एक टन द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मात्र रात्री केलेली ही सजावट सकाळी पूर्णपणे गायब झाली.
यानंतर विठुरायाच्या दारातील द्राक्ष कोणी चोरली, कोणी खाल्ली? अशी चर्चा सुरु झाली.
पण हे द्राक्ष ना कोणी चोरले, ना कोणी खाल्ले. तर ही सजावट मंदीर प्रशासनाकडूनच हटविण्यात आली.
भाविकांनी हे घड तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे द्राक्षचे मनी रस्त्यात सांडून चिकटपणा निर्माण होऊ लागला.
म्हणून मंदिर प्रशासनाने द्राक्षांची आरास स्वतः हुन काढून टाकली.