मुंबई तक
बिअर प्रेमींमध्ये कोरोनाचा दर्जा हा सुपरहिरोसारखा आहे. हा मेक्सिकन ब्रँड आता एक स्टेट्स बनला आहे.
कोरोनाला 'मोस्ट व्हॅल्युएबल बीअर ब्रँड' ही पदवी मिळाली आहे. या बिअर ब्रँडला जवळपास एक शतकाचा इतिहास आहे.
बेल्जियन कंपनी AB Inbeb च्या मालकीच्या Cervecería Modelo या मेक्सिकन बिअर फॅक्टरीमध्ये बिअरचे उत्पादन केले जाते.
'लागर' या श्रेणीत येणारी ही बिअर पहिल्यांदा 1927 मध्ये मेक्सिको सिटीतील ग्रुपो मॉडेलो ब्रुअरीमध्ये तयार करण्यात आलेली.
ही बिअर यूएसमध्ये सर्वात जास्त आयात केली जाते. अमेरिका, भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये याला पसंती आहे.
कोरोना बिअरची जी बाटली असते त्याचा तोंडावर लिंबाचा तुकडा ठेवून सर्व्ह केली जाते. पण असं नेमकं का केलं जाते?
दावा असा आहे की, लिंबातील सायट्रिक अॅसिड बाटली उघडताना निर्जंतुकीकरण करण्यास आणि माश्या दूर ठेवण्यास मदत करते.
असे म्हणतात की, धातूच्या झाकणाचा गंज कधीकधी बाटलीच्या तोंडावर येतो आणि त्यातील अशुद्धता दूर करण्यासाठी लिंबाचे काप लावले जातात.
काहींचा मते, पारदर्शक बाटली असल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर बिअरची चव बदलते, म्हणून त्यात लिंबू घालणे चांगले.