मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर हे दगड का ठेवलेत? त्यांना काय म्हणतात?

मुंबई तक

मुंबई म्हटलं की समुद्र आलाच. मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, मरीन लाईन्स यासारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत.

मरीन ड्राईव्हचं आकर्षण तर देशभरातून येणाऱ्या लोकांना असतं. मरीन ड्राईव्ह गेलं की किनाऱ्यावर दिसतात त्रिकोणी दगड.

मरीन ड्राईव्हला दिसणाऱ्या दगडांना टेट्रापॉड म्हणून ओळखले जाते.

या टेट्रापॉड्सना समुद्रकिनारी ठेवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. याबाबत जाणून घेऊयात.

टेट्रापॉड हे समुद्राभोवतीच्या रेतीची धूप होण्यापासून संरक्षण करतात.

जर हे टेट्रापॉड्स नसतील तर समुद्राच्या आजूबाजूच्या भागाला फटका बसण्याची शक्यता आहे.

समुद्रकिनारी असलेल्या रेतीची धूप होण्यापासून रोखण्यासाठी हे दगड इंटरलॉक करून ठेवले जातात.

टेट्रापॉड्सचा प्रथम वापर फ्रान्समध्ये झाला होता. या दगडांच्या वजनाबद्दल बोलायचं झालं तर, यांचे वजन दोन टनांपासून ते 10 टनांपर्यंत असू शकते.

हे दगड 90 च्या दशकात मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर आणण्यात आले होते.