Ananat Ambani यांच्या साखरपुड्यात नीता अंबानींनी कोणाचे दागिने घातलेले?

मुंबई तक

नीता अंबानींचा रॉयल लूक

मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांचा नुकताच साखरपुडा पार पडला.

नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या सुनेचे रॉयल लूकमध्ये स्वागत केले.

साखरपुड्याच्या निमित्ताने नीता अंबानी यांनी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला पारंपरिक गुजराती लेहेंगा परिधान केलेला.

पण नीता अंबानी यांनी या लेहेंग्यासोबत मुलगी ईशा अंबानीचे ब्रायडल दागिने परिधान केलेले.

डिझायनरने सांगितले की, नीता अंबानी यांचा बेज-सोनेरी रंगाचा घागरा हा हाताने बनवला होता, जो खूपच गुंतागुंतीचा होता.

घागऱ्यावर जरदोसी चिकनकारीसह पटोला सिल्क, क्रिस्टल आणि सिक्वीन्सचे बारकाईने काम करण्यात आले होते.

यात बर्न्ट केशरी ब्लाउज हा सिल्क मटेरियअलने तयार करण्यात आला होता.

तर दुपट्टाही पारंपारिक पद्धतीने मोती, सिल्क आणि जरदोजी बॉर्डरने बनवण्यात आलेला.

नीता अंबानींचा हा संपूर्ण लूक रॉयल वाटत होता.