WhatsApp चं नवं फीचर, कुणालाही घेता येणार नाही स्क्रीनशॉट!

मुंबई तक

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp कडून यूजर्संसाठी सातत्यानं नवंनवे फीचर्स आणले जातात.

WhatsAppने आतापर्यंत आणलेल्या सर्वच फीचर्संना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता WhatsApp ने नव्याने काही फीचर्स आणले आहेत.

WhatsApp ने यूजर्ससाठी तीन नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. यूजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर्स आणले गेले आहेत.

यूजर्संना कल्पना नसेल, असे फीचर्सने WhatsAppने आणले आहेत. यातीलच एक फीचर्स आहे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचं. या फीचरमुळे कुणालाही WhatsApp वरील चॅटचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.

View Once मेसेजससाठी फीरच जारी करण्यात आलं आहे. View Once फीचरमुळे यूजर फक्त एकदा दिसणारे फोटो आणि व्हिडीओ पाठवू शकतात. पण तरीही लोक याचा स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करत होते.

आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर WhatsApp ने ती दूर करण्याचं काम कंपनीकडून सुरू आहे. कंपनीने स्क्रीनशॉट ब्लॉकर फीचरची घोषणा केलीये.

या फीचरमुळे View once द्वारे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजसचे लोकांना स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत.

या फीचरची मागणी WhatsApp कडे यूजर्संकडून केली जात होती. स्क्रीनशॉट ब्लॉकर फीचरशिवाय व्ह्यू वन्स फीचर काही कामाचं नव्हतं.

स्क्रीनशॉट ब्लॉकर फीचरसाठी लोकांना काही काळ प्रतिक्षा करावी लागू शकते. कंपनीने घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत हे फीचर लाँच केलं जाऊ शकतं.

Snapchat आणि telegram मध्ये हे फीचर आधीपासूनच आहे. त्याचबरोबर स्नॅपचॅटच्या यूजर्संना टाईम सेन्सेटिव्ह मेसेज पाठवण्याचीही सुविधाही आहे. त्यामुळे हे मेसेज वेळेनंतर डिलीट होऊन जातात आणि यूजर्स त्याचे स्क्रीनशॉटही घेऊ शकत नाही.