मुंबई तक
कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय युवा महोत्सवापूर्वी पंतप्रधान मोदींनी हुबळीत रोड शो केला होता.
रोड शोवेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ पुष्पहार घेऊन धावत आला होता.
यावेळी विशेष संरक्षण पथकाने तत्काळ त्या व्यक्तीला मोदींपासून दूर केलं होतं.
विशेष संरक्षण पथक असूनही ही घटना घडल्याने मोदींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे हा चर्चेचा विषय बनला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची सध्या चौकशी केली जात आहे.
तसेच, व्हायरल व्हिडीओत पुष्पहार घेऊन आलेल्या व्यक्तीचा हार मोदींनी स्वीकारलेला दिसत आहे.