मुंबई तक
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा उडवला आहे.
सध्याच्या पिढीतील महान सलामीवीरांपैकी एक असलेल्या रोहित शर्माला 'हिटमॅन' देखील म्हटले जाते.
'हिटमॅन' हे नाव रोहित शर्माला टीव्ही क्रूचे सदस्य पीडी यांनी दिले.
रोहितने पहिल्यांदा वनडेत द्विशतक झळकावल्यावर त्याला हे नाव मिळालं.
पीडीने रोहितला सांगितले की, 'तू हिटमॅनप्रमाणे फलंदाजी करतोस आणि तुझे नावही रो-'हिट' आहे.'
त्यावेळी रवी शास्त्रीही तिथे उभे होते आणि कॉमेंट्री दरम्यान त्यांनीही रोहितला 'हिटमॅन' म्हणायला सुरुवात केली.
रोहित आता न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही कर्णधार असणार आहे.