Bigg Boss Marathi: ठाण्यात वडील चालवतात रिक्षा... असा आहे अक्षयचा प्रवास?

मुंबई तक

बिग बॉस मराठी सीजनच्या 4 हंगामाचा विजेता ठरला ठाणेकर अक्षय केळकर.

बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाच्या शर्यतीत अनेक नावं होती, मात्र अक्षय केळकरने बाजी मारली.

बिग बॉस मराठी विजेता अभिनेता अक्षय केळकरला प्रेक्षकांनी भरघोस पसंती दिली.

अक्षय केळकरबद्दल सांगायचं म्हणजे तो मूळचा आहे ठाणे जिल्ह्यातील. त्याचे बालपण तिथेच गेले.

अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. घरची परिस्थितीत बेताचीच असली, तरी त्याने मात्र उत्कर्ष साधलाय.

अक्षय म्हणतो, "मला आईबाबांचा अभिमान वाटतो. मी अभिनेता असलो, तरी बाबा रिक्षा चालवतात."

अक्षय केळकरनं त्याचं शिक्षण वरळीतील एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पूर्ण केलं.

अक्षय हा मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील अलिकडच्या काळातील प्रसिद्ध चेहरा आहे.

अक्षय केळकरने हिंदी मालिका, मराठी चित्रपट, वेब स्टोरीजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

अक्षयला मराठी बिग बॉस 4 मध्ये अँग्री यंग मॅन' म्हणून ओळखलं जात गेलं.