कोण आहे BTech पाणीपुरीवाली?, सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

मुंबई तक

दिल्लीतील टिळक नगर येथे राहणारी एक तरूणी पाणीपुरी विकून जबरदस्त चर्चेत आली आहे.

या तरूणीचं नाव तापसी उपाध्याय असं आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

तापसीने दिल्लीतील टिळक नगर भागातील मार्केटमध्ये एक छोटा स्टॉल सुरू केला होता. जिथे ती पाणीपुरी विकायची.

तापसी बीटेकची विद्यार्थिनी आहे. ती सांगते की, तिला सुरुवातीपासूनच बाईक चालवायला आणि हेल्दी फूड खाण्याची आवड होती.

अभियांत्रिकीच्या अभ्यासादरम्यान नवीन स्टार्टअप कल्पना सुचली आणि तेलाविना तळलेल्या पुरीसह ती पाणीपुरी विकते.

तापसीने बीटेक पाणीपुरी वाली या नावाने हा स्टॉल सुरू केला.

लोकांना पाणीपुरीची चव माहीत होती, मात्र, तिची ही अनोखी पद्धत लोकांना खूप आवडली.

तापसी उपाध्याय म्हणते की सध्या दिल्लीत इतर चार ठिकाणी तिचे स्टॉल्स आहेत, त्यांची संख्या आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे.