मुंबई तक
ऋषभ पंतच्या कारला देहरादूमध्ये अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरोज पंत आहे.
वडील राजेंद्र पंत यांचे 2017 मध्ये निधन झाले. ऋषभ पंतला क्रिकेटर बनवण्यात त्याच्या आईची महत्त्वाची भूमिका आहे.
पंत 12 वर्षांचा असताना तो आपल्या आईसोबत दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जात असे.
पंतची बहीण साक्षी देखील सोशल मीडिया सेन्सेशन आहे. ती अनेकदा आपल्या भावाचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात असते.
ऋषभ पंतचे वडील राजेंद्र पंत हे स्वतःची खाजगी शाळा चालवायचे, ज्यामध्ये जिल्हाभरातून मुले शिक्षणासाठी येत असत.
पंतला स्टार क्रिकेटर बनवण्यात वडिलांचीही महत्त्वाची भूमिका आहे, जे लहानपणी कॉर्क बॉलने सराव करायचे.
दिल्लीत राहण्यासाठी घर नसल्यामुळे ऋषभ पंत आपल्या आईसोबत मोतीबागच्या गुरुद्वारात राहायचा.
ऋषभ पंतने भारतीय संघासाठी 1 फेब्रुवारी 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध बंगळुरू टी20 सामन्यात पदार्पण केलं होतं.