Tunisha Sharma : तुनिषाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जात असलेला शीजान खान कोण?

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येला तिचा कथित प्रियकर शीजान खानला जबाबदार धरण्यात आला आहे.

All Photo Credit Instagram

सुत्रांच्यानुसार तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे.

शीजान ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषाचा सहकलाकार आहे. या मालिकेत तो अलिबाबा या मुख्य भूमिकेत होता.

 शीजान व तुनिषाचे ऑफ सेट संबंधही चांगले असल्याचं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन समजतं. तुनिषाने तिच्या इन्स्टाग्रामवर शीजानबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

जागतिक पुरुष दिनाच्या दिवशीही तिने शीजानसाठी खास पोस्ट लिहिली होती. तुनिषा व शीजान एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या.

तुनिषाप्रमाणेच शीजानही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरली होती.

प्रसिद्ध अभिनेत्री फलक नाझचा तो छोटा भाऊ आहे. तुनिषाने शीजान खानच्याच मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.