रोहित गोळे
इंडियन प्रीमियर लीग-2023 साठी नुकताच मिनी लिलाव पार पडला आहे.
या लिलावात भारतीय खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला आहे.
असे अनेक भारतीय क्रिकेटर आहेत ज्यांना संघांनी कोट्यवधी रुपयांना विकत घेतलं आहे.
मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटींना विकत घेतलं आहे.
युवा खेळाडू शिवम मावीला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.
मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटींना विकत घेतलं आहे.
जम्मूच्या विवरांत शर्माला हैदराबादने 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
मनिष पांडे आता दिल्लीकडून खेळणार असून त्याला 2.4 कोटी रुपये मिळाले आहेत.