Joshimath भूगर्भात होणार गडप, जमिनीला का जातायेत तडे?

मुंबई तक

उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये जमीन खचल्याने आणि घरांच्या भिंतींना तडे गेल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Pic Credit: Getty Images

जोशीबाग, मनोहर बाग ते मारवाडीपर्यंत सातत्याने जमिनी आणि भिंतींना मोठमोठे तडे जात आहे.

Pic Credit: Getty Images

या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत, तर अनेक कुटुंबांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय.

Pic Credit: Getty Images

लष्कराला अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आले आहे, तसेच प्रशासन लष्कराच्या सतत संपर्कात आहे.

Pic Credit: Getty Images

दरड कोसळण्याचे कारण शोधता यावे यासाठी गेल्या चार महिन्यांतील येथील अनेक गोष्टी तपासल्या जात आहेत.

Pic Credit: Getty Images

इस्रो एक-दोन दिवसात जोशीमठाची छायाचित्रे प्रसिद्ध करेल. त्यानंतर भूस्खलनाची स्थिती स्पष्ट होईल.

Pic Credit: Getty Images

600 हून अधिक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत 44 कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

Pic Credit: Getty Images

जोशीमठच्या मनोहर बाग परिसरातील घरांना तडे गेल्याने लोकांना अश्रू अनावर झाले आहेत.

Pic Credit: Getty Images

जोशीमठ येथे दरड कोसळल्याने भगवती मंदिर कोसळले आहे.

Pic Credit: Getty Images