मुंबई तक
अर्जेंटिनाने चमकदार कामगिरी करत फिफा विश्वचषका 2022 चे विजेतेपद पटकावले.
यासोबतच लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.
मेस्सी जेव्हा विश्वचषक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर गेला तेव्हा कतारच्या अमीरने त्याला काळा गाऊन घातला.
या काळ्या गाउनला कतारमध्ये बिष्ट म्हणतात आणि तो मेंढी किंवा बकरीच्या लोकरपासून बनवला जातो.
हा काळा गाऊन कतारमध्ये फक्त खास प्रसंगी परिधान केला जातो.
कतारमध्ये फक्त रॉयल फॅमिली आणि धर्मगुरुच हा गाऊन घालू शकतात.
अशा परिस्थितीत कतारने हा गाऊन मेस्सीला देऊन त्याचा अनोख्या प्रकारे सत्कारच केला आहे.