मुंबई तक
दारू पिण्याचा उद्देश नशा करणे हाच असेल तर मग जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने दारू का सर्व्ह केली जाते?
तज्ज्ञांच्या मते, दारू सर्व्ह करण्यासाठी सर्वोत्तम ग्लास तोच आहे जो दारुचा रंग, सुगंध अनुभवण्यास मदत करतो.
ग्लास देखील असा असावा की ज्यामध्ये दारु ओतल्यानंतर त्याचात असणाऱ्या नैसर्गिक गुणात कोणत्याही बदल होता कामा नये.
तुमच्या लक्षात आले असेल की, ज्या ग्लासमध्ये व्हिस्की दिली जाते त्या ग्लासच्या खालील भाग हा बर्याचदा जाड असतो.
जाड तळाचा असण्याचा उद्देश हा असतो की, व्हिस्कीची नैसर्गिक उबदारता टिकवून ठेवणे.
असं यासाठी की, ज्या पृष्ठभागावर ग्लास ठेवला जाईल, त्या पृष्ठभागाच्या तापमानाचा ग्लासातील दारुवर परिणाम होऊ नये.
तापमान बदलले की व्हिस्कीची चव बदलते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्याचे नैसर्गिक तापमान राखले पाहिजे.
म्हणूनच वाइन तज्ज्ञ म्हणतात की, ग्लास हा बेसजवळ पकडावा जेणेकरून कारण आपल्या बोटांच्या उबदारपणामुळेही व्हिस्कीच्या चवीत बदल होऊ शकतो.