भारतीय U19 महिला संघाच्या कॅप्टनची इतकी चर्चा का होतीय?

मुंबई तक

भारतीय U19 महिला संघ सध्या साऊथ अफ्रिकेत अंडर19 टी20 विश्व चषक खेळत आहे.

अंडर 19 विश्व चषकामध्ये भारतीय महिला संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.

दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व सलामीची स्टार फलंदाज शेफाली वर्मा करत आहे.

या स्पर्धेत शेफाली अप्रतिम फलंदाजी करत आहे. दोन्ही सामन्यात तिने चांगलीच फटकेबाजी केली आहे.

पहिल्या सामन्यात शेफालीने साऊथ अफ्रिकेसोबत खेळताना 45 धावांची कामगिरी केली होती.

तर दुसऱ्या सामन्यात युएईच्या विरुद्ध 34 चेंडूत 78 धावांची ताबडतोब फलंदाजी केली. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा होत आहे.