जखमी ऋषभ पंत IPL मध्ये खेळणार का? सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं

मुंबई तक

कार अपघातात जखमी झालेल्या भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.

आता तो पुढील इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या मोसमात खेळू शकणार नाही. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी हा खुलासा केला आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गांगुली आता आयपीएलमध्ये नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाला आहे.

आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सौरव गांगुलीची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हे पद स्वीकारल्यानंतर गांगुलीने एक मोठा अपडेट दिला आहे.

'त्याला ठिक होण्यासाठी वेळ लागेल. आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. हा अपघात आहे. तो आता फक्त 23 वर्षांचा आहे. त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे, असं गांगुली म्हणाला.

'ऋषभ पंत आयपीएलसाठी उपलब्ध होणार नाही. मी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संपर्कात आहे, असं गांगुली म्हणाला.

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. त्याला पुर्णपणे रिकव्हर होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे.