मुंबई तक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सातारा जिल्ह्यातून काही महिला पर्यटक आल्या होत्या.
यावेळी महिला पर्यटक आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटन कर घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
साताऱ्यावरून आलेल्या महिला पर्यटकांनी कर देण्यास नकार दिला होता.
यानंतर, महिला पर्यटकांनी कर आकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली होती.
या वादातून महिला पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली.
सातारा येथील महिला पर्यटकांनी कर वसूल करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
नंतर, सातारा येथील महिला पर्यटक किल्ले सिंधुदुर्गचे पर्यटन करून परतल्यानंतर त्यांची पुन्हा महिला कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी झाली.
हाणामारीमुळे हा वाद मालवण पोलीस स्थानकात पोहोचला.
मालवण पोलीस स्थानकात सातारा येथील महिला पर्यटकांनी त्या महिलांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.