भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी किती?

मुंबई तक

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका भारताने 2-0 अशा फरकाने जिंकली.

कसोटी मालिकेतील विजयाबरोबर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान मजबूत झालंय.

भारत आता पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला टॉप 2 मध्येच राहावं लागेल.

भारताला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 4-0 ने जिंकला, तर फायनलमध्ये सहज पोहोचेल.