गौतम अदाणींच्या यशाचा मंत्र काय?

मुंबई तक

गौतम अदाणी हे जगभरातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. जे सध्या यशाचे झेंडे गाडतायेत.

All Photo Sources Google | M. Scott Brauer

अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी गे जगभरातील 10 श्रीमंतांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतात. तसंच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीत अदाणी 125.8 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत

या यशाच्या मागे मेहनतीसह एक सक्सेस मंत्रा पण आहे. याबाबत स्व:ता अदाणींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

ते म्हणाले, आमचे सगळे उद्योग व्यावसायिक लोक आणि सक्षम सीईओ चालवतात.

अदाणी म्हणाले, मी कधीच त्यांच्या रोजच्या कामाच देत नाही. माझं काम दिशा दाखवणं, भांडवल वाटप आणि कामाचं पुनरावलोकन करणं हे आहे.

या पद्धतीनं इतका मोठा उद्योग सांभाळण्यासह नवीन उद्योगावर आणि नवीन संधींवर लक्ष ठेवत असतो, असं अदाणी म्हणाले.